माझे काय चुकले ???
आज वर नेहमी शांत राहून मी रे
खूप काही ऐकून घेतले
तुझे प्रत्येक आरोप मी नाहक माझ्या
मस्तकी मारून घेतले
💟💟💟💟💟💟
तुझ्या प्रेमाखातर मी प्रत्येक वेळी
स्वतःलाच चुकीचे ठरवले
तू मला सोडून जाऊ नये या भीतीपोटी
तुला प्रत्येकच गोष्टीचे प्रमाण दिले
❣️❣️❣️❣️❣️❣️
पण आज मात्र हे सर्व माझ्या
सहनशीलतेच्या बाहेर झाले
माझेच प्रश्न आज मलाच टोचू लागले
💟💟💟💟💟💟
एवढे सत्यपणाने आणि प्रामाणिक राहूनही
मी काय मिळवले
स्वतःच्या मान सन्मानासाठी अन् स्वतःच्या
सुखासाठी जर आज मी स्वतः उभी राहिले
तर यात माझे काय चुकले ???
❣️❣️❣️❣️❣️❣️
✍️
कल्पना 💞 Only Idea 💞
अप्रतिम रचना ताई 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🙏🌷
ReplyDeleteअप्रतिम रचना ताई
ReplyDeleteसुंदर शब्द रचना...👌✍️👍🍫🍫
ReplyDelete