जीव माझा.. तुझ्यासाठी
ऋणानुबंध

चेहरा तिचा हसरा लाजरा
जणू अंगणी मोहरला श्वेतवर्णीय मोगरा
सुगंधाने त्याच्या दरवळला आसमंत सारा
गोड गोंडुली चिमणी आमची जेव्हा आली
लक्ष्मीच्या पावलाने घरा
🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️
बघता बघता कळी उमलून फुल झाली
काव्य रुपाने ती प्रत्येकाच्या मनात बहरली
माया, ममता अन प्रेमाची उबदार सावली
जेव्हा माझ्या आयुष्यात माझी चिमणी बनून आली
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
शब्दाशब्दातूनच ते मैत्री रुपी किरण
जीवन अंगणी पसरले
बघा ना दैवयोगाची पण काय किमया
कुठून कसे हे ऋणानुबंध प्रतिलिपीच्या
रूपाने जुळले
🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
स्वच्छ आणि सुंदर मनाची ती श्वेता
पवित्र आणि निर्मळ नात्याचा ठेवा
सदैव अखंडित राहो तिच्या माझ्या
मैत्री प्रेमाचा हा नाजुक धागा
निरोगी आणि सुदृढ आयुष्य,
यश, किर्तीने बहरलेले उज्वल
भविष्य लाभो तिला सदैव देवा
🙏🙏🙏
तर अशी माझी ही छानशी, सुंदरशी, गोंडस चिमणी जीचा आज आयुष्यातला सर्वात सुंदर आणि मंगलमय दिवस म्हणजेच वाढदिवस आहे 🤗🤗🤗आणि तिच्या ह्या आजच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला देण्यासाठी म्हटलं तर माझ्याकडे काहीच नाही 😒😒😒 आणि म्हटलं तर माझ्याकडे तिला देण्यासाठी खूप काही आहे 😇😇😇जसे की सगळ्यात पहिल्यांदाच ह्या शब्दरुपी शुभेच्छा 💐💐💐 मनापासून आशीर्वाद 👐👐👐 आणि कायम तिच्या आयुष्यात सुख,शांती, समाधान बरसत रहावं यासाठी निस्वार्थ प्रार्थना 🙏🙏🙏
आणि म्हणूनच आज मी बाप्पाकडे एकच मागणं मागेन 🤲 माझ्या चिमणीला कायम तिच्या आयुष्यात सुखी राहू दे कुठलाही दुःख किंवा कुठलेही संकट तिच्यावर येऊ देऊ नकोस आणि तिचा प्रत्येक दिवस अगदी हसत खेळत💞💞🌹🌹 आनंदात पार पडत राहो
प्रिय चिमणे (श्वेता) :
वाढदिवसाच्या तुला लक्ष लक्ष शुभेच्छा
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊✨✨✨✨✨✨✨✨✨✨🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍔🍔🍔🍔🍔🍕🍕🍕🍕🍕🍟🍟🍟🍟🍟🧀🧀🧀🧀🍖🍖🍖🍖🍖🍗🍗🍗🥐🥐🥐🥐🍝🍝🍝🍝🍜🍜🍜🍜🍜🍛🍛🍛🍛🍭🍭🍭🍭🍭🍬🍬🍬🍬🍬🍬🍫🍫🍫🍫🍧🍧🍧🍧🍨🍨🍨🍨🍨🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️
आणि हो हि🖕 तुझ्या वाढदिवसाची पार्टी ज्यात तुला आवडणारे व्हेज💚, नॉनव्हेज ❤️सगळे पदार्थ आणि विशेष करून तिखट तिखट मिरची सुद्धा दिली आहे कारण तुला तिखट खूप आवडतं ना म्हणून 😁😁😁
तर ह्या शब्दरूपी शुभेच्छा आणि इमोजी रुपी पार्टी स्वीकार कर आपल्या शब्दवेड्या दि कडून 🤗🤗🤗
तुुझीच शेरणी दि
✍️
🌿कल्पना(Only idea)शब्दवेडी 🌿
🕊️
some word for my best AABA
अलवार शब्दातून जेव्हा ते
माझी काळजी घेतात
आबाच नाही माझे बाबाचं मला
जणू प्रत्यक्षात भेटतात
🤗💕🤗💕🤗💕🤗💕🤗💕🤗
आपल्या प्रेमळ शब्दातून जेव्हा ते मला
हळूच हॅलो बाळा कल्पु म्हणतात
काय सांगू माझ्यासाठी किती साऱ्या
माया, ममता आणि प्रेमाच्या वाटा खुल्या होतात
❤️💚❤️💚❤️💚❤️💚❤️💚❤️💚❤️
शब्दाशब्दात त्यांच्या असतो आपुलकी
आणि आपलेपणाचा लळाकाव्यपुष्प रूपाने त्यांनी कित्येक
साहित्यिकांसाठी केलाय खुला साहित्याचा मळा
💚💛💚💛💚💛💚💛💚💛💚💛💚
मळ्यात या उमलतात जेव्हा
कित्येक काव्यरूपी फुले
पाहून हा मळा मग माझेही मन
फुलपाखरू बनून स्वच्छंदी उडे
🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹
आता बस मागणे माझे फक्त एकच
त्या बाप्पांकडे
सदा सुख, शांती, समाधान तसेच एक निरोगी
आणि उदंड आयुष्याची शिदोरी असो माझ्या
बाबांकडे (आबांकडे)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹Dedicate to my lovely AABA🌹
one your daughter
💕 कल्पु 💕
मार्गशीर्षातील गुरुवारच्या शुभेच्छा
माझी छाया
निष्पाप तुझ्या या चेहऱ्यात गं
मला दिसे माझीच प्रतिमा
अवघड तुझी ती किती लोभस अदा
माझाच तू अंश अन् माझीच तू छाया
💗💗💗💗💗💗💗💗💗💗
तुझ्यातच हरवलाय जीव माझा सारा
तुझ्यातच तर भेटलाय मला बालपणीचा
माझा तो रम्य गाव पुन्हा
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
तुझ्यातच तर हरवले मी स्वतःलाही
अन विसरून गेले साऱ्याच दुःखाला
तुझ्यातच आता माझी आई बहीण
आणि तुझ्यावरच कुर्बान माझी सारी ममता
👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧
तूच माझ्या एकांताची खरी सोबतीन
तूच माझी सखी अन मैत्रीण
तू एक निरागस कळी माझी अन
मीच तुझी माळ राखीन
🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷
आयुष्यभर ठेवेल तुला तळहातावरच्या
फोडाप्रमाणे जपून
येवोत किती हि वादळे दुःखाचे भरून
जावे लागेल त्यांना आधी मला ओलांडून
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘
बाप्पा तुझ्याकडे आज फक्त
एकच मागणे माझे
काळजाचा हा माझा टुकडा रे
कर रक्षण तू आयुष्यभर याचे
🤗🤗🤗🙏🙏🙏
✍️
🌿कल्पना(Only Idea)शब्दवेडी🌿
🕊️
Super Fast Charoli Queen
शब्दांची ती जादूगरीन
एकेक रचना तिची बेहतरीन
प्रत्येक शब्दात गंध मोगर्याचा असतो
जाऊन थेट वाचकाच्या मनाला भिडतो
🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺
काय मी करु तिचे कौतुक आणि तिची स्तुती
शब्दातून सर्वांना सुख आणि प्रेम वाटते ती
प्रेमाचा आणि ममतेचा निखळ झरा
तिच्या मनात नसे भेदभाव कसला
🌊💖🌊💖🌊💖🌊💖🌊💖🌊💖
लेखणीला तिची अशी काही धार
कडकती कमान अन् तेज तलवार
शब्दरूपी फुलांची होते कायम
तिच्यातून बरसात
प्रेम, वात्सल्य, मैत्री अन स्त्री जीवनाचं
व्यक्त करते सारं सार
💗🌷💗🌷💗🌷💗🌷💗🌷💗
आज तीन हजार रचनांची तिनी
बाजी मारली
विदेशापर्यंत तिची ख्याती पसरली
सोबतच स्त्री श्रेणीतही प्रथम आली
🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷
एक छोटासा प्रयत्न करून तिला मी
ही माझी शब्दरूपी भेट अर्पियली
ती माझी रंजू ताई आज चारोळीची
"Super fast Charoli queen"
म्हणून उदयास आली
👸👸👸👸👸👸👸👸👸👸👸
माझ्या प्रिय वाचक कवी लेखक मित्र-मैत्रिणींना
सांगताना मला अतिशय हर्ष होत आहे 🤗की आपल्या सर्वश्रुत असलेल्या चारोळीच्या महाराणी👸 Super fast Charoli Queen सौ उर्मिला ताई परुळकर म्हणजेच रंजू ताईंनी एक नवा इतिहास घडवला आज त्यांनी अक्षरक्षा: तीन हजार 😲 चारोळ्या पूर्ण केल्यात अशा आपल्या सदाबहार रंजू ताई..... कायम प्रत्येकाला प्रोत्साहन देणाऱ्या, समजून घेणाऱ्या व समजावून सांगणाऱ्या रंजू ताईंना लक्ष लक्ष शुभेच्छा💐 व त्यांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन🤝 बाप्पाच्या कृपेने त्यांची ही लेखणी कायम अशीच अखंडित चालू राहो✍️ व यशाचे उंचच्या उंच शिखर त्या गाठत राहोत हीच इच्छा व बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना त्यांच्यासाठी🙏🙏🙏🙏🙏🙏
पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा रंजुताई
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💐💐💐💐💐💐, 🍫🍫🍫🍫
✍️
🌿कल्पना Only Idea शब्दवेडी🌿
🕊️
अंतरीचे सुख (क्षणभराचे)
पॉकेट मनी
जर नमतं घेतलं असतं
झालं गेलं विसरता आलं असतं
एकमेकांना समजून घेऊन
गैरसमजाला दूर सारता आलं असतं
कोमेजलेल्या रोपट्याला पुन्हा
फुलवता आलं असतं
थोडं मी अन् थोडं तु ही जर
नमत घेतलं असतं
रागाला थोडं दूर ठेवून जर
प्रेमाने प्रेमालाच आठवलं असतं
तुझ्या माझ्यातलं अंतर नक्कीच
मिटलं असतं
थोडं मी तर थोडं तू हि मला
सावरलं, सांभाळलं असतं
नक्कीच आपल्या प्रीतीचं फुल
पाकळी न् पाकळी उमललं असतं
✍️
🌿 कल्पना(Only Idea) शब्दवेडी🌿
🕊️
तुझ्या भेटीची ओढ | फक्त कल्पना | शब्दवेडी
मी अशी | फक्त कल्पना | शब्दवेडी