🔥🔥🔥
आज बरेच वर्षानंतर तो तिच्यासमोर आला होता...
ध्यानीमनी काहीच नसतांना अशी अचानक भेट होईल तिला वाटलेच नव्हते. 😱
क्षणभर त्याला पाहून खूप आनंद वाटला जाऊन एक घट्ट मिठी मारावी असेही वाटले पण दुसऱ्याच क्षणाला सगळा भूतकाळ डोळ्यांसमोर ठेपला.😒
आणि अचानक ती भानावर आली समोरच असलेल्या त्या आरशात तिला स्वतःचे प्रतिबिंब दिसले......
हाच तो चेहरा एका शुल्लक कारणासाठी त्याने तिला नापसंत केले होते आणि तिला त्या रंगावरून हिनावून अपमानित केले होते.... कारण ती रंगाने खूपच काळी होती.
पण आज तोच तिला पाहून मंत्रमुग्ध झाला होता. तिचं ते रूप किती अप्रतिम दिसत होतं अगदी काळ्याकुट्ट आकाशात लखलखणारी चांदणी जशी. 🌟
मैत्रिणीचा नवरा होता म्हणून त्याला चार लोकांमध्ये अगदी आनंदाने पण औपचारिकपणे shake hand करत होती चेहऱ्यावर उसण हसू आणून अगदी उत्साहित पणे बोलत होती पण मात्र मनातली ती वेदना ती कुठेच दबत नव्हती वारंवार उफाळून येत होती आणि त्याच बरोबर डोळ्यातले अश्रू हि मोकळे व्हायला कुठेतरी वाट पाहत होते.😥
त्याने जरी तिच्यावर खोटे प्रेम करून तिचा केवळ फायदा घेतला असेल पण तिने मात्र अगदी तना मनाने त्याच्यावर खरे प्रेम ❤️ केले होते मग बरोबर आहे ना खरं प्रेम कधी कोणी विसरू शकतं ???😊
आणि ते असं चार चौघांमध्ये, असं गर्दीत समोर आलं तर त्या गर्दीला भूलवण्यासाठी भलेही आपण खोटे हसु पण मनातली वेदना ती कधीच कुठेच हसत नाही त्यातून फक्त दाह 🔥 होत राहतो
दिसायला अतिशय सुंदर पण रंग मात्र काळा आणि म्हणुनच त्याने तिला एक प्रकारे वापरून घेतले प्रेमाच्या नावाखाली.... आणि सोडून दिलं.....
.बहानाही तोच केला खूप काळी असल्याचा.......पण परमेश्वराची कृपा नशीब उजळलं 😇 अतिशय धनाढ्य असा नवरा भेटला आणि तिने पैशाच्या जोरावर स्वतःला अशी काही बदलून घेतली की पहाणारा केवळ तिला पहातच रहायचा.
अख्खा समारंभ पार पडेपर्यंत ती त्या गर्दीतला प्रत्येक चेहऱ्याला खोट्या हास्याच्या दिखाव्याने भूलवत राहिली.... पण मनातल्या वेदनेचा दाह ती नाही विझवू शकली.😊😒
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
✍️
कल्पना 💞 Only Idea 💞