मी आहे अशी
खळणारी नदी जशी
चमचमणारी विज जशी
मनसोक्त वाहणारा वारा जसा
स्वच्छंदी आकाशी मुक्त उडणारा पक्षी जसा
झुळझुळ वाहणारा पाण्याचा झरा
एखादा
अलवार भावनांचा पसारा सारा
वास्तविकतेची जाण ठेवून सत्यात
उतरणाऱ्या स्वप्नांचा गाव माझा
मला वेध नाविण्याचे नकोत
विचार संकुचित आणि बुरसटलेले
माझ्या छायेत येणाऱ्याला
ओलावा केवळ प्रेमाचा
नाही जाणवणार त्याला इथे
भेदभाव कशाचाच
नकोत मला बंधने ती खोटी आणि
बळजबरीची
मी आहे राणी फक्त माझ्याच
मनाची
असेल मी कितीही बेफिकीर
जगणारी
मात्र खोटेपणा फसवेगिरी आणि
चापलूसी
मला ना अजिबात खपणारी
माझ्याच धुंदीत मी मदमस्त असते
दिवसभर काम आणि रात्रीला
माझ्या डायरी पेनातच वसलेले
माझे छोटेशे एक गाव असते
नावाचा मला माझ्या अभिमान
वाटतो
त्याला सार्थकी बनवण्याचा प्रयत्न कायम असतो
नावाप्रमाणेच कल्पना पण मी
वास्तवात आहे
मात्र कुणी कुणी मला स्वप्नातच
पाहणे पसंत करतो
आहे मी अशी राहणारही
अशीच
माझ्यावर चालते फक्त मर्जी माझीच
नाही बदलली नाही बदलणारही मी
कधीही, कुठेही, कुणाही साठी
बाप्पांवर 🙏माझी श्रद्धा अपार
त्यांचीही कृपा असते माझ्यावर
फार
प्रत्येक वेळी संकटातूनी मला टाळती
कुकर्म आणि कुबुद्धी पासूनी
कायम दूर ठेवती
✍️
🌿कल्पना(Only Idea) शब्दवेडी🌿
🕊️
खूप खुप सुंदर लिहिलं आहेस कल्पना 👌🏻👌🏻
ReplyDelete🙏🙏 खूप खूप धन्यवाद मॅम 🌹🌹
ReplyDeleteखुप खुप छान ताई, एक नंबर,माझ्या ताईच्या नावाचा ब्लाॅग बनला खुप आनंद झाला मला,खुप खुप शुभेच्छां ताई 🌿🌿🌿🌿🍁🍁🍁🍁🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🙏🙏🙏🙏🙏☺😊
ReplyDeleteतुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏💐💐
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteThank you so much Rushali mam 🙏
DeleteWOW....!! 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteकल्पना ऽ ... क्या बात है........!!
तुझं खूप खूप अभिनंदन !! 🌷
आणि तुझ्या Blogger उपक्रमास शुभेच्छा 🙏
पण खरंच... कसलं भरी introduction दिलंय ....!!
अप्रतिमच खूपच सुंदर शब्द आणि शब्दांकन..!!
आणि मनाच्या भावना व्यक्त केल्या आहेत खूपच छान 👌
मन हेच कुठल्याही idea चे खरं मैत्र असते...!!
सतत धावणारं मन जेव्हा एखाद्या आयडिया संगे
एकरूप होऊन जाते ... तेव्हा जी निर्मिती होत असते..
ती तीच एकमेव अशीच तुझ्या सारखीच असते...!!
आणि मग तिलाच आम्ही सगळे ..!!
"आयडीया " कल्पनाची
असेच कायम म्हणत असतो.... !!
खूपच छान अप्रतिम "कल्पू".....लई भारी....!! 👌
आबा ... 🙏
🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
खरं तर तुमची समीक्ष वाचून अतिशय भारावून गेले मी आबा🤗🤗🤗 काय बोलावं कळेनासं झालंय 😊 खूपच सुंदर आणि अप्रतिम समीक्षा दिली तुम्ही मला आणि खूप आनंदही वाटला की तुम्ही हा उपक्रम चालू करून सर्व कवी लेखकांना इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिलाय.
Deleteआता प्रत्येक कवी लेखकाची इच्छा व त्याचे स्वप्न इथे पूर्ण होणार आणि ह्या द्वारे तो आपलं साहित्य प्रत्येक वाचकापर्यंत सहज पोहोचवू
शकेल. खूप खूप आभार तुमचे आबा🙏🙏🙏
खुप छान रचना 👌🏼👌🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼🙏🏼
Thank you so much Ganesh da 🙏
Deleteवा, अतिशय सुंदर , स्वतःच्याच मर्जीने
ReplyDeleteवागणारी, चुलबुली, चैतन्याचा खळाळता झरा
तू, आयडियाची कल्पना ओन्ली मस्तच👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹
मनापासून खूप खूप धन्यवाद राजश्रीताई 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫
Deleteकल्पनाजी,खरंच आहे...तुमचे काव्यलेखन वाचून वाटते की सुंदर
ReplyDelete" कल्पना फक्त " तुम्हालाच जमू शकते.व्वाव...अप्रतीम!✍️������
खूप छान सुंदर शब्द रचना....👌👍✍️🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteखुप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteउगाच आगेशी खेळण्याचा प्रयत्न करू नये बाळा माणूस होरपळून निघतो 🤣🤣🤣😂😂😂
ReplyDelete🙏🙏 thanks for your best comments