अंतरीचे सुख (क्षणभराचे)

ओल्या त्या पावसात तोही 
चिंब भिजत होता 
तीही चिंब भिजत होती
दोघांच्या मधात न जाणो कसली
 ती अनामिक एक भिंत होती
🌧️🌧️🌧️🌧️🌧️
त्याची ती अभेद नजर तिच्यावर 
सारखी रोखलेली होती
तिच्याही मनाची सारखी 
घालमेल होत होती
💗💗💗💗💗
क्षणभर वाटून जात होते त्याच्या 
त्या घट्ट मिठीला बिलगून जावे
मुसळधार बरसणाऱ्या त्या
धुवांधार पावसात
स्वतःला रोमरोमी फुलवून घ्यावे
☺️☺️☺️☺️☺️
दुरवर दिसत होते जे काही
आज त्याला अलवार स्वतःच्या 
कुशीत घ्यावे, क्षणभरासाठीच का असेना 
पण आज हे अंतरीचे सुख मिळावे.
🤗🤗🤗🤗🤗

                                         ✍️
                   🌿 कल्पना Only Idea शब्दवेडी🌿
                                         🕊️

10 comments:

  1. अप्रतिम खुप सुंदर रचना, अप्रतिम रचना

    ReplyDelete
  2. वाह वा कल्पना ..मस्त एकदम रोमँटिक कविता

    केलीस..मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. खूप सुंदर रचना...👍👌✍️🍫🌹

    ReplyDelete
  4. Khupch sundhar lihales g apratim rachna keley 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  5. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  6. व्वा कल्पना खुप छान शब्दानी कविता रचली आहेस 👌👌

    ReplyDelete
  7. खूपचं सुंदर भावमा मांडलात ताई
    romantic रचना

    ReplyDelete
  8. व्वा क्या बात है सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे

    ReplyDelete
  9. वा, अप्रतिम रचना केली मॅडम 👌👌👌👌👌

    ReplyDelete