Showing posts with label विरह. Show all posts
Showing posts with label विरह. Show all posts

माझे काय चुकले ???

माझे काय चुकले ???

आज वर नेहमी शांत राहून मी रे
खूप काही ऐकून घेतले
तुझे प्रत्येक आरोप मी नाहक माझ्या
मस्तकी मारून घेतले
              💟💟💟💟💟💟
तुझ्या प्रेमाखातर मी प्रत्येक वेळी
स्वतःलाच चुकीचे ठरवले
तू मला सोडून जाऊ नये या भीतीपोटी
तुला प्रत्येकच गोष्टीचे प्रमाण दिले
               ❣️❣️❣️❣️❣️❣️
पण आज मात्र हे सर्व माझ्या
सहनशीलतेच्या बाहेर झाले
माझेच प्रश्न आज मलाच टोचू लागले
               💟💟💟💟💟💟
एवढे सत्यपणाने आणि प्रामाणिक राहूनही
मी काय मिळवले
स्वतःच्या मान सन्मानासाठी अन्  स्वतःच्या
सुखासाठी जर आज मी स्वतः उभी राहिले
तर यात माझे काय चुकले ???
               ❣️❣️❣️❣️❣️❣️
                                                       ✍️
                                 कल्पना 💞 Only Idea 💞


निरोप... शेवटचा



निरोप त्याला देतांना
कंठ दाटून आला होता
ओठां मधला शब्द
ओठातच गोठून गेला होता

विरहाच्या कल्पनेने
आसमंत सारा गहिवरला होता
नजरेच्या वाटेने तो
थेंबथेंब धरतीवर या बरसला होता

सहवास तो केवळ
क्षण दोन क्षणांचाच होता
मात्र त्यातच खरा आयुष्याचा
अर्थ उमगला होता

हातातून हात सोडवतांना
प्राण कंठाशी येत होता
त्याची तर अवस्था अशी
जणू जिवंतपणी तो जळत होता

भेट ही घडीभराची मात्र
विरह जन्मभराचा होता
कारण एकमेकांना दिलेला
निरोप तो शेवटचा होता
😊😊😒😒😒
                                                      ✍️
                                    कल्पना 💞 Only Idea 💞

तुझीच असून तुझीच न होऊ शकलेली
       💕कृष्णा तुझीच राधा वेडी💕


एक रात्र


ती एका पणती सारखी जळत होती
तो पतंगा बनून घीरट्या मारत होता
ती हि कुठेतरी झुरत होती
तोही सारखा मनात कुढत होता
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
दोघांच्याही मनाची अलवार दोर
नकळत बांधल्या जात होती
तिच्यात तो गुंतत होता तीही
त्याच्यात घडीभराचं सुख घेत होती
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
थोड्याच वेळात ती पुढल्या प्रवासाला
निघणार होती रातभराच तिचं अस्तित्व
पहाट होताच ती विझणार होती
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
त्याच्या मनाची अवस्था तिला
ही समजत होती
तिची ही घालमेल त्याच्याही
नजरेपासून लपत नव्हती
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
माहित नाही असं कुठलं कोडं पडलं
होतं जे सोडता सुटत नव्हत
अनामिक त्या नात्याचं आयुष्य रात्रीपुरतंच
मर्यादित होतं
सकाळी दोघांनाही विभक्त व्हायचं होतं
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷

                                                  ✍️
                                 कल्पना 💞 Only Idea 💞