Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

निरोप... शेवटचा



निरोप त्याला देतांना
कंठ दाटून आला होता
ओठां मधला शब्द
ओठातच गोठून गेला होता

विरहाच्या कल्पनेने
आसमंत सारा गहिवरला होता
नजरेच्या वाटेने तो
थेंबथेंब धरतीवर या बरसला होता

सहवास तो केवळ
क्षण दोन क्षणांचाच होता
मात्र त्यातच खरा आयुष्याचा
अर्थ उमगला होता

हातातून हात सोडवतांना
प्राण कंठाशी येत होता
त्याची तर अवस्था अशी
जणू जिवंतपणी तो जळत होता

भेट ही घडीभराची मात्र
विरह जन्मभराचा होता
कारण एकमेकांना दिलेला
निरोप तो शेवटचा होता
😊😊😒😒😒
                                                      ✍️
                                    कल्पना 💞 Only Idea 💞

तुझीच असून तुझीच न होऊ शकलेली
       💕कृष्णा तुझीच राधा वेडी💕


एक रात्र


ती एका पणती सारखी जळत होती
तो पतंगा बनून घीरट्या मारत होता
ती हि कुठेतरी झुरत होती
तोही सारखा मनात कुढत होता
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
दोघांच्याही मनाची अलवार दोर
नकळत बांधल्या जात होती
तिच्यात तो गुंतत होता तीही
त्याच्यात घडीभराचं सुख घेत होती
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
थोड्याच वेळात ती पुढल्या प्रवासाला
निघणार होती रातभराच तिचं अस्तित्व
पहाट होताच ती विझणार होती
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
त्याच्या मनाची अवस्था तिला
ही समजत होती
तिची ही घालमेल त्याच्याही
नजरेपासून लपत नव्हती
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
माहित नाही असं कुठलं कोडं पडलं
होतं जे सोडता सुटत नव्हत
अनामिक त्या नात्याचं आयुष्य रात्रीपुरतंच
मर्यादित होतं
सकाळी दोघांनाही विभक्त व्हायचं होतं
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷

                                                  ✍️
                                 कल्पना 💞 Only Idea 💞


ऋणानुबंध





चेहरा तिचा हसरा लाजरा
जणू अंगणी मोहरला श्वेतवर्णीय मोगरा
सुगंधाने त्याच्या दरवळला आसमंत सारा
गोड गोंडुली चिमणी आमची जेव्हा आली
लक्ष्मीच्या पावलाने घरा
🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️
बघता बघता कळी उमलून फुल झाली
काव्य रुपाने ती प्रत्येकाच्या मनात बहरली
माया, ममता अन प्रेमाची उबदार सावली
जेव्हा माझ्या आयुष्यात माझी चिमणी बनून आली
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
शब्दाशब्दातूनच ते मैत्री रुपी किरण
जीवन अंगणी पसरले
बघा ना दैवयोगाची पण काय किमया
कुठून कसे हे ऋणानुबंध प्रतिलिपीच्या
रूपाने जुळले
🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
स्वच्छ आणि सुंदर मनाची ती श्वेता
पवित्र आणि निर्मळ नात्याचा ठेवा
सदैव अखंडित राहो तिच्या माझ्या
मैत्री प्रेमाचा हा नाजुक धागा
निरोगी आणि सुदृढ आयुष्य,
यश, किर्तीने बहरलेले उज्वल
भविष्य लाभो तिला सदैव देवा
🙏🙏🙏

तर अशी माझी ही छानशी, सुंदरशी, गोंडस चिमणी जीचा आज आयुष्यातला सर्वात सुंदर आणि मंगलमय दिवस म्हणजेच वाढदिवस आहे 🤗🤗🤗आणि तिच्या ह्या आजच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला देण्यासाठी म्हटलं तर माझ्याकडे काहीच नाही 😒😒😒 आणि म्हटलं तर माझ्याकडे तिला देण्यासाठी खूप काही आहे 😇😇😇जसे की सगळ्यात पहिल्यांदाच ह्या शब्दरुपी शुभेच्छा 💐💐💐 मनापासून आशीर्वाद 👐👐👐 आणि कायम तिच्या आयुष्यात सुख,शांती, समाधान बरसत रहावं यासाठी निस्वार्थ प्रार्थना 🙏🙏🙏
आणि म्हणूनच आज मी बाप्पाकडे एकच मागणं मागेन 🤲 माझ्या चिमणीला कायम तिच्या आयुष्यात सुखी राहू दे कुठलाही दुःख किंवा कुठलेही संकट तिच्यावर येऊ देऊ नकोस आणि तिचा प्रत्येक दिवस अगदी हसत खेळत💞💞🌹🌹 आनंदात पार पडत राहो

प्रिय चिमणे (श्वेता) :
                   वाढदिवसाच्या तुला लक्ष लक्ष शुभेच्छा
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊✨✨✨✨✨✨✨✨✨✨🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍔🍔🍔🍔🍔🍕🍕🍕🍕🍕🍟🍟🍟🍟🍟🧀🧀🧀🧀🍖🍖🍖🍖🍖🍗🍗🍗🥐🥐🥐🥐🍝🍝🍝🍝🍜🍜🍜🍜🍜🍛🍛🍛🍛🍭🍭🍭🍭🍭🍬🍬🍬🍬🍬🍬🍫🍫🍫🍫🍧🍧🍧🍧🍨🍨🍨🍨🍨🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️
आणि हो  हि🖕 तुझ्या वाढदिवसाची पार्टी ज्यात तुला आवडणारे व्हेज💚, नॉनव्हेज ❤️सगळे पदार्थ आणि विशेष करून तिखट तिखट मिरची सुद्धा दिली आहे कारण तुला तिखट खूप आवडतं ना म्हणून 😁😁😁

तर ह्या शब्दरूपी शुभेच्छा आणि इमोजी रुपी पार्टी स्वीकार कर आपल्या शब्दवेड्या दि कडून 🤗🤗🤗
                                          तुुझीच शेरणी दि   

                                                ✍️
                    🌿कल्पना(Only idea)शब्दवेडी 🌿
                                             🕊️


मार्गशीर्षातील गुरुवारच्या शुभेच्छा

आज मार्गशीर्षातील पहिला गुरुवार या निमित्ताने मी सर्वांसाठी घेऊन आले माझी हि कविता.....


💐मार्गशीर्षातील म्हणून गुरुवारच्या शुभेच्छा 💐
आज आहे मार्गशीर्षातील
पहिला गुरुवार
बरसो सर्वांवर श्री महालक्ष्मी मातेची
कृपा अपरंपार
  🌺       🌺         🌺
दुःख, दारिद्र्याचा प्रत्येकाच्या
नाश व्हावा
मातेच्या कृपेचा, त्यांच्या आशीर्वादाचा
प्रसाद सगळ्यांना मिळावा
  🌼       🌼       🌼
सुख शांती समाधान नांदावे
प्रत्येकाच्या घरोघरी
नव चैतन्य आणि आनंदी सुखाचे दिप
उजळो प्रत्येकाच्या दारोदारी
   🏵️       🏵️         🏵️

दुष्ट आणि क्रूर शक्तींचा व्हावा ऱ्हास
शुभ कार्यातून मंगल विचार येवोत उदयास
रोगराई दूर होऊन निरोगी, सुदृढ आयुष्य
लाभो प्रत्येकास
   🌹        🌹        🌹
आजच्या या शुभ मुहूर्तावर या शुभ दिनी
हीच माझी इच्छा, प्रार्थना मातेच्या शुभ चरणी
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार अतिशय शुभ असा दिवस 🤗🤗🤗 आणि ह्याच मंगल दिवसाच्या माझ्या सर्व वाचक परिवारास मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐 आणि मन भरून प्रेमाशीर्वाद 
🙏🙏

                                              ✍️
                       🌿कल्पना Only Idea शब्दवेडी🌿
                                              🕊️

अंतरीचे सुख (क्षणभराचे)

ओल्या त्या पावसात तोही 
चिंब भिजत होता 
तीही चिंब भिजत होती
दोघांच्या मधात न जाणो कसली
 ती अनामिक एक भिंत होती
🌧️🌧️🌧️🌧️🌧️
त्याची ती अभेद नजर तिच्यावर 
सारखी रोखलेली होती
तिच्याही मनाची सारखी 
घालमेल होत होती
💗💗💗💗💗
क्षणभर वाटून जात होते त्याच्या 
त्या घट्ट मिठीला बिलगून जावे
मुसळधार बरसणाऱ्या त्या
धुवांधार पावसात
स्वतःला रोमरोमी फुलवून घ्यावे
☺️☺️☺️☺️☺️
दुरवर दिसत होते जे काही
आज त्याला अलवार स्वतःच्या 
कुशीत घ्यावे, क्षणभरासाठीच का असेना 
पण आज हे अंतरीचे सुख मिळावे.
🤗🤗🤗🤗🤗

                                         ✍️
                   🌿 कल्पना Only Idea शब्दवेडी🌿
                                         🕊️

तुझ्या भेटीची ओढ | फक्त कल्पना | शब्दवेडी

                     तुझ्या भेटीची ओढ

                 सवय ही फार वाईट असते
                 जवळ असलेलं माणूस दूर 
                 गेल्यावर खूप खूप रडवते

                 वेदना ह्या आठवणीतल्या
                 यातना ह्मा विरहातल्या
                 काळजात सलते 
                 दिवसरात्र मग लोचनातून
                 केवळ अश्रुंचाच पूर  वाहते
🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺

                  कितीही बाहेर काढलं तरी
                  मन हे भूतकाळातच जावून 
                  शिरते
                  भविष्य कितीही सुखमय असलं
                  तरीही ते नकोसच वाटते

                  खरं सांगू का तुला तुझ्याशिवाय     
                  आता मला मीही नकोशी वाटते
                  तुझ्या मिलनाची ती ओढ मला 
                  कायम अस्वस्थ करते
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
                                                         ✍️
                                     🌿कल्पना(Only Idea)🌿
                                                      🌺