मार्गशीर्षातील गुरुवारच्या शुभेच्छा
माझी छाया
निष्पाप तुझ्या या चेहऱ्यात गं
मला दिसे माझीच प्रतिमा
अवघड तुझी ती किती लोभस अदा
माझाच तू अंश अन् माझीच तू छाया
💗💗💗💗💗💗💗💗💗💗
तुझ्यातच हरवलाय जीव माझा सारा
तुझ्यातच तर भेटलाय मला बालपणीचा
माझा तो रम्य गाव पुन्हा
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
तुझ्यातच तर हरवले मी स्वतःलाही
अन विसरून गेले साऱ्याच दुःखाला
तुझ्यातच आता माझी आई बहीण
आणि तुझ्यावरच कुर्बान माझी सारी ममता
👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧👩👧
तूच माझ्या एकांताची खरी सोबतीन
तूच माझी सखी अन मैत्रीण
तू एक निरागस कळी माझी अन
मीच तुझी माळ राखीन
🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷
आयुष्यभर ठेवेल तुला तळहातावरच्या
फोडाप्रमाणे जपून
येवोत किती हि वादळे दुःखाचे भरून
जावे लागेल त्यांना आधी मला ओलांडून
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘
बाप्पा तुझ्याकडे आज फक्त
एकच मागणे माझे
काळजाचा हा माझा टुकडा रे
कर रक्षण तू आयुष्यभर याचे
🤗🤗🤗🙏🙏🙏
✍️
🌿कल्पना(Only Idea)शब्दवेडी🌿
🕊️
मी अशी | फक्त कल्पना | शब्दवेडी