Super Fast Charoli Queen





शब्दांची ती जादूगरीन
एकेक रचना तिची बेहतरीन
प्रत्येक शब्दात गंध मोगर्‍याचा असतो
जाऊन थेट वाचकाच्या मनाला भिडतो
🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺
काय मी करु तिचे कौतुक आणि तिची स्तुती
शब्दातून सर्वांना सुख आणि प्रेम वाटते ती
प्रेमाचा आणि ममतेचा निखळ झरा
तिच्या मनात नसे भेदभाव कसला
🌊💖🌊💖🌊💖🌊💖🌊💖🌊💖
लेखणीला तिची अशी काही धार
कडकती कमान अन् तेज तलवार
शब्दरूपी फुलांची होते कायम
तिच्यातून बरसात
प्रेम, वात्सल्य, मैत्री अन स्त्री जीवनाचं
व्यक्त करते  सारं सार
💗🌷💗🌷💗🌷💗🌷💗🌷💗
आज तीन हजार रचनांची तिनी
बाजी मारली
विदेशापर्यंत तिची ख्याती पसरली
सोबतच स्त्री श्रेणीतही प्रथम आली
🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷
एक छोटासा प्रयत्न करून तिला मी
ही माझी शब्दरूपी भेट अर्पियली
ती माझी रंजू ताई आज चारोळीची
"Super fast Charoli queen"
म्हणून उदयास आली
👸👸👸👸👸👸👸👸👸👸👸

माझ्या प्रिय वाचक कवी लेखक मित्र-मैत्रिणींना
सांगताना मला अतिशय हर्ष होत आहे 🤗की आपल्या सर्वश्रुत असलेल्या चारोळीच्या महाराणी👸 Super fast Charoli Queen सौ उर्मिला ताई परुळकर म्हणजेच रंजू ताईंनी एक नवा इतिहास घडवला आज त्यांनी अक्षरक्षा:  तीन हजार 😲 चारोळ्या पूर्ण केल्यात अशा आपल्या सदाबहार रंजू ताई..... कायम प्रत्येकाला प्रोत्साहन देणाऱ्या, समजून घेणाऱ्या व समजावून सांगणाऱ्या रंजू ताईंना लक्ष लक्ष शुभेच्छा💐 व त्यांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन🤝 बाप्पाच्या कृपेने त्यांची ही लेखणी कायम अशीच अखंडित चालू राहो✍️ व यशाचे उंचच्या उंच शिखर त्या गाठत राहोत हीच इच्छा व बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना त्यांच्यासाठी🙏🙏🙏🙏🙏🙏
पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा रंजुताई

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💐💐💐💐💐💐,                       🍫🍫🍫🍫

                                           ✍️
                   🌿कल्पना Only Idea शब्दवेडी🌿
                                         🕊️


अंतरीचे सुख (क्षणभराचे)

ओल्या त्या पावसात तोही 
चिंब भिजत होता 
तीही चिंब भिजत होती
दोघांच्या मधात न जाणो कसली
 ती अनामिक एक भिंत होती
🌧️🌧️🌧️🌧️🌧️
त्याची ती अभेद नजर तिच्यावर 
सारखी रोखलेली होती
तिच्याही मनाची सारखी 
घालमेल होत होती
💗💗💗💗💗
क्षणभर वाटून जात होते त्याच्या 
त्या घट्ट मिठीला बिलगून जावे
मुसळधार बरसणाऱ्या त्या
धुवांधार पावसात
स्वतःला रोमरोमी फुलवून घ्यावे
☺️☺️☺️☺️☺️
दुरवर दिसत होते जे काही
आज त्याला अलवार स्वतःच्या 
कुशीत घ्यावे, क्षणभरासाठीच का असेना 
पण आज हे अंतरीचे सुख मिळावे.
🤗🤗🤗🤗🤗

                                         ✍️
                   🌿 कल्पना Only Idea शब्दवेडी🌿
                                         🕊️

पॉकेट मनी



सकाळी उठून मला जे 
जवळपास दिसत होते🤔🤔🤔
बहुतेक ते माझ्या यजमानांचे 
मनी पॉकेट होते💰💰🤩🤩
बघितले तर कळून चुकले 
हाय रे दैव का माझ्यावर असे 
कोपले  होते कारण😒😒😏
ते फक्त खाली होते
मी डोक्यावर हात घेऊन 🤦‍♀️🤦‍♀️
स्वतःलाच म्हटले अंतरीचे ते सुख 
का माझ्याकडे नव्हते😔😞😞
                                                  ✍️
                     🌿कल्पना(Only Idea)शब्दवेडी🌿
                                               🕊️

जर नमतं घेतलं असतं


झालं गेलं विसरता आलं असतं
एकमेकांना समजून घेऊन
गैरसमजाला दूर सारता आलं असतं
कोमेजलेल्या रोपट्याला पुन्हा
फुलवता आलं असतं
थोडं मी अन्  थोडं तु ही जर
नमत घेतलं असतं
रागाला थोडं दूर ठेवून जर
प्रेमाने प्रेमालाच आठवलं असतं
तुझ्या माझ्यातलं अंतर नक्कीच  
मिटलं असतं
थोडं मी तर थोडं तू हि मला
सावरलं, सांभाळलं असतं
नक्कीच आपल्या प्रीतीचं फुल
पाकळी न् पाकळी उमललं असतं
                                           ✍️
                   🌿 कल्पना(Only Idea) शब्दवेडी🌿
                                          🕊️


तुझ्या भेटीची ओढ | फक्त कल्पना | शब्दवेडी

                     तुझ्या भेटीची ओढ

                 सवय ही फार वाईट असते
                 जवळ असलेलं माणूस दूर 
                 गेल्यावर खूप खूप रडवते

                 वेदना ह्या आठवणीतल्या
                 यातना ह्मा विरहातल्या
                 काळजात सलते 
                 दिवसरात्र मग लोचनातून
                 केवळ अश्रुंचाच पूर  वाहते
🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺

                  कितीही बाहेर काढलं तरी
                  मन हे भूतकाळातच जावून 
                  शिरते
                  भविष्य कितीही सुखमय असलं
                  तरीही ते नकोसच वाटते

                  खरं सांगू का तुला तुझ्याशिवाय     
                  आता मला मीही नकोशी वाटते
                  तुझ्या मिलनाची ती ओढ मला 
                  कायम अस्वस्थ करते
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
                                                         ✍️
                                     🌿कल्पना(Only Idea)🌿
                                                      🌺


मी अशी | फक्त कल्पना | शब्दवेडी

  

मी आहे अशी 
खळणारी नदी जशी
चमचमणारी विज जशी
मनसोक्त वाहणारा वारा जसा
स्वच्छंदी आकाशी मुक्त उडणारा पक्षी जसा
झुळझुळ वाहणारा पाण्याचा झरा
एखादा
अलवार भावनांचा पसारा सारा
वास्तविकतेची जाण ठेवून सत्यात 
उतरणाऱ्या स्वप्नांचा गाव माझा
मला वेध नाविण्याचे नकोत
विचार संकुचित आणि बुरसटलेले
माझ्या छायेत येणाऱ्याला
ओलावा केवळ प्रेमाचा
नाही जाणवणार त्याला इथे
भेदभाव कशाचाच
नकोत मला बंधने ती खोटी आणि
बळजबरीची
मी आहे राणी फक्त माझ्याच
मनाची
असेल मी कितीही बेफिकीर
जगणारी
मात्र खोटेपणा फसवेगिरी आणि
चापलूसी
मला ना अजिबात खपणारी
माझ्याच धुंदीत मी मदमस्त असते
दिवसभर काम आणि रात्रीला
माझ्या डायरी पेनातच वसलेले
माझे  छोटेशे एक गाव असते
नावाचा मला माझ्या अभिमान
वाटतो
त्याला सार्थकी बनवण्याचा प्रयत्न कायम असतो
नावाप्रमाणेच कल्पना पण मी
वास्तवात आहे
मात्र कुणी कुणी मला स्वप्नातच
पाहणे पसंत करतो
आहे मी अशी राहणारही
अशीच
माझ्यावर चालते फक्त मर्जी माझीच
नाही बदलली नाही बदलणारही मी
कधीही, कुठेही, कुणाही साठी
बाप्पांवर 🙏माझी श्रद्धा अपार
त्यांचीही कृपा असते माझ्यावर
फार
प्रत्येक वेळी संकटातूनी मला टाळती
कुकर्म आणि कुबुद्धी पासूनी
कायम दूर ठेवती
                 ✍️
🌿कल्पना(Only Idea) शब्दवेडी🌿
      🕊️