झालं गेलं विसरता आलं असतं
एकमेकांना समजून घेऊन
गैरसमजाला दूर सारता आलं असतं
कोमेजलेल्या रोपट्याला पुन्हा
फुलवता आलं असतं
थोडं मी अन् थोडं तु ही जर
नमत घेतलं असतं
रागाला थोडं दूर ठेवून जर
प्रेमाने प्रेमालाच आठवलं असतं
तुझ्या माझ्यातलं अंतर नक्कीच
मिटलं असतं
थोडं मी तर थोडं तू हि मला
सावरलं, सांभाळलं असतं
नक्कीच आपल्या प्रीतीचं फुल
पाकळी न् पाकळी उमललं असतं
✍️
🌿 कल्पना(Only Idea) शब्दवेडी🌿
🕊️