जीव माझा.. तुझ्यासाठी

       ❤️माझा जीव.. तुझ्यासाठी ❤️

रुसू नकोस ना रे असा जीव माझा
तुझ्या शिवाय लागत नाही
कोणता घडतो गुन्हा माझा असा तेच
मला कळत नाही
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘
प्रेम माझे एकमेव तुझ्यावरच
किती वेळा देऊ मी याची ग्वाही
तू असा उदास असतांना माझा
प्राणही कंठाशी येई
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
तुझ्या पासूनच तर वेड्या माझ्या
आयुष्याची  खरी सुरुवात
तू सोबत असला तरच करू शकते ना रे
मी प्रत्येक यातना, वेदना,अन दुःखांवरही मात
💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗
नको रे अशी माझी अग्निपरिक्षा घेऊस
चूक नसतांनाही माझी मला अशी शिक्षा देवूस
हस ना रे राजा माझ्यासाठी तू
हवं तर तुझ्यासाठी देते मी माझा जीव
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

💚कृष्णा आजही फक्त
           तुझीच असलेली राधा 💚

                                       ✍️
                     🌿कल्पना(Only Idea)🌿
                                      🕊️

2 comments:

  1. Wowwww ... Superb writing ✍️
    Khupch chhan lihily jabardasth
    khupch chhan....

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुरेख ताई

    ReplyDelete