माझी छाया



निष्पाप तुझ्या या चेहऱ्यात गं
मला दिसे माझीच प्रतिमा
अवघड तुझी ती किती लोभस अदा
माझाच तू अंश अन् माझीच तू छाया
💗💗💗💗💗💗💗💗💗💗

तुझ्यातच हरवलाय जीव माझा सारा
तुझ्यातच तर भेटलाय मला बालपणीचा
माझा तो रम्य गाव पुन्हा
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

तुझ्यातच तर हरवले मी स्वतःलाही
अन विसरून गेले साऱ्याच दुःखाला
तुझ्यातच आता माझी आई बहीण
आणि तुझ्यावरच कुर्बान माझी सारी ममता
👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧

तूच माझ्या एकांताची खरी सोबतीन
तूच माझी सखी अन मैत्रीण
तू एक निरागस कळी माझी अन
मीच तुझी माळ राखीन
🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷

आयुष्यभर ठेवेल तुला तळहातावरच्या
फोडाप्रमाणे जपून
येवोत किती हि वादळे दुःखाचे भरून
जावे लागेल त्यांना आधी मला ओलांडून
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘

बाप्पा तुझ्याकडे आज फक्त
एकच मागणे माझे
काळजाचा हा माझा टुकडा रे
कर रक्षण तू आयुष्यभर याचे
🤗🤗🤗🙏🙏🙏

                                          ✍️
                   🌿कल्पना(Only Idea)शब्दवेडी🌿
                                         🕊️


13 comments:

  1. बाप्पा नेहमी त्याच्या कृपेचा वरदहस्त शरण्यावर ठेऊ दे...खूपच छान रचना..👌👍😘🍫🍫🍫🍫🍫✍️🌹

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद मानसी दि 🙏🙏🌹🌹🌹🌹🍫🍫🤗
      तिच्या मावशीचा एवढाच आशीर्वाद भरपूर आहे तिच्यासाठी 😊

      Delete
  2. खुपच छान रचना केलीयस कल्पना 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद गणेश दा 🙏🙏💐💐💐🍫🍫🍫🤗

      Delete
  3. अप्रतिम रचना केली मॅडम 👌👌👌👌👌बाप्पाचा आशीर्वाद असणारच
    पाठीशी मॅडम, तुमच्या गोड परीच्या पाठीशी

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद राजश्रीताई 🙏🙏🌹🌹🌹🍫🍫🍫🤗🤗

      Delete
  4. खुप खुप छान रचना लिहिलय ताई, लेकीबद्दल अप्रतिम

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏💐💐🍫🍫🤗🤗

      Delete
  5. खुपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद अश्विनी मॅडम 🙏🙏🌹🌹🍫🍫🤗

      Delete
  6. अतिशय सुंदर रचना केली

    ReplyDelete
  7. खूप खूप धन्यवाद माधुरी मॅम 🙏🙏🌹🌹🍫🍫🤗🤗

    ReplyDelete
  8. व्वाऽ..!
    लेकराला आणि तिच्या अशा प्रेमळ आईला खूप खूप खूप खूप शुभेच्छा..🌷 आणि दुनियेतील सरी सुख तिला मिळोत हिच मनोमन इच्छा...🙏
    So sweet Gudiya.. 🌷
    💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷
    आबा
    🙏

    ReplyDelete