Super Fast Charoli Queen





शब्दांची ती जादूगरीन
एकेक रचना तिची बेहतरीन
प्रत्येक शब्दात गंध मोगर्‍याचा असतो
जाऊन थेट वाचकाच्या मनाला भिडतो
🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺
काय मी करु तिचे कौतुक आणि तिची स्तुती
शब्दातून सर्वांना सुख आणि प्रेम वाटते ती
प्रेमाचा आणि ममतेचा निखळ झरा
तिच्या मनात नसे भेदभाव कसला
🌊💖🌊💖🌊💖🌊💖🌊💖🌊💖
लेखणीला तिची अशी काही धार
कडकती कमान अन् तेज तलवार
शब्दरूपी फुलांची होते कायम
तिच्यातून बरसात
प्रेम, वात्सल्य, मैत्री अन स्त्री जीवनाचं
व्यक्त करते  सारं सार
💗🌷💗🌷💗🌷💗🌷💗🌷💗
आज तीन हजार रचनांची तिनी
बाजी मारली
विदेशापर्यंत तिची ख्याती पसरली
सोबतच स्त्री श्रेणीतही प्रथम आली
🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷
एक छोटासा प्रयत्न करून तिला मी
ही माझी शब्दरूपी भेट अर्पियली
ती माझी रंजू ताई आज चारोळीची
"Super fast Charoli queen"
म्हणून उदयास आली
👸👸👸👸👸👸👸👸👸👸👸

माझ्या प्रिय वाचक कवी लेखक मित्र-मैत्रिणींना
सांगताना मला अतिशय हर्ष होत आहे 🤗की आपल्या सर्वश्रुत असलेल्या चारोळीच्या महाराणी👸 Super fast Charoli Queen सौ उर्मिला ताई परुळकर म्हणजेच रंजू ताईंनी एक नवा इतिहास घडवला आज त्यांनी अक्षरक्षा:  तीन हजार 😲 चारोळ्या पूर्ण केल्यात अशा आपल्या सदाबहार रंजू ताई..... कायम प्रत्येकाला प्रोत्साहन देणाऱ्या, समजून घेणाऱ्या व समजावून सांगणाऱ्या रंजू ताईंना लक्ष लक्ष शुभेच्छा💐 व त्यांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन🤝 बाप्पाच्या कृपेने त्यांची ही लेखणी कायम अशीच अखंडित चालू राहो✍️ व यशाचे उंचच्या उंच शिखर त्या गाठत राहोत हीच इच्छा व बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना त्यांच्यासाठी🙏🙏🙏🙏🙏🙏
पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा रंजुताई

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💐💐💐💐💐💐,                       🍫🍫🍫🍫

                                           ✍️
                   🌿कल्पना Only Idea शब्दवेडी🌿
                                         🕊️


6 comments:

  1. अप्रतिम...👌
    खूपच छान शब्दात गौरविण्यात आले आहे..!!
    अप्रतिम लेखनशैली.. शब्दांकन खूप भारी 👌
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद आबा 🙏🙏💐💐🍫🍫

      Delete
  2. अतिशय सुंदर लिहिलंय....अप्रतिमच रचना 👌👌👌👌💐💐💐
    ताईंचे मनापासून खूप खूप अभिनंदन👏👏💐💐💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सचिन भाऊ 🙏🙏🙏💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫

      Delete
  3. खुप खूप छान लिहलस ..मस्त च खूप आभारी
    आहे कल्पना 🙏💕🍫🍫☕

    ReplyDelete